देवमाशाला होते चार पाय; काय आहे हे नवं संशोधन?

 तुम्हाला जर कुणी असं सांगितलं की माशांना सुद्धा पाय होते, आणि ते पोहण्यासोबतच जमिनीवर चार पायांनी चालू शकत होते. हे ऐकून तुम्ही एखाद्याला वेड्यात नक्कीच काढाल. मात्र, थांबा! कारण तब्बल 4 कोटी 30 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर अशा प्रकारच्या माशांची प्रजाती अस्तित्वात होती. चार पाय असणाऱ्या देवमाशांची प्रजाती इजिप्तमध्ये अस्तित्वात असल्याचा शोध संशोधकांनी लावलाय. या प्रजातीला फिओमिसिटस अनुबिस असं नाव देण्यात आले आहे. इजिप्तच्या पश्चिम भागातील एका वाळवंटात देवमाशाचे हे जीवाश्म आढळून आले आहेत. या जीवाश्माच्या कवटीचा आकार इजिप्तमधील अनुबिस या देवतेसारखी असल्याने त्याला अनुबिस हेच नाव देण्यात आल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

इजिप्तमध्ये फायूम डिप्रेशन भागात या व्हेलच्या सांगाड्याचे अंश आढळून आले आहेत. याचा अभ्यास मन्सुरा युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केला. सध्या हा परिसर एक वाळवंट बनलं असलं तरी कधी काळी हा भूभाग समुद्राने आच्छादित केलेला होता. सध्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवाश्म आढळून येतात.



देवमाशाचं वजन तब्बल 600 किलोचार प्राण्यांच्या व्हेलला शिकार करणं सोपं जावं यासाठी त्याच्या जबड्याची रचना अतिशय मजबूत प्रकारची होती. या माशाचं वजन 600 किलोग्राम असावं आणि त्यांची लांबी 3 मीटर असावी, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. हा अभ्यास मन्सौरा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी बुधवारी प्रोसीडिंग्स ऑफ द रॉयल सोसायटी बी: ​​बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये प्रकाशित केला आहे. फिओमिसिटस अनुबिस ही एक देवमाशाची महत्त्वाची प्रजाती होती. नवी प्रजाती आफ्रिकेत सापडलेली सर्वात जुनी व्हेल मानली जाते. ते पृथ्वीवर सुमारे 1 कोटी वर्ष राहत होते.

Comments